Quote of the week

Sunday, 2 November 2014

विशेष पालकत्व आणि समुपदेशन …….

                 
                 Special Parenting & Counselling

विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे संगोपन म्हणजे पालकांसाठी तारेवरची कसरत असते. मुळातच या अनपेक्षितपणे अंगावर कोसळलेल्या संकटामुळे सुरुवातीच्या काळात मन भांबावून गेलेलं असत. या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय समस्येविषयी काही माहिती नसते. या अज्ञानाच्या जोडीला असतात कुटुंबीय आप्तस्वकीयांची  विविध मते सल्ले आणि अनोळखी माणसांच्या नजरेत उमटणारे प्रश्न. हे सगळ भाविष्याविषयीच्या अनिश्चितता काळजी यात  भरच घालत असतात. जसा काळ जातो तसं मन भानावर येत, वास्तवाचा स्वीकार करत, पण आत झालेल्या जखमा पूर्ण भरलेल्या असतातच असं नाही.

बर, विशेष मुल आहे म्हणून नियतीने त्यांना बाकीच्या समस्यांमधून सवलत दिलेली नसते. त्याही त्यांच्या गतीने रोरावून अंगावर येतच असतात. कधीकधी तर त्या उंटाच्या पाठीवरची काडी  ठरतात. आई वडील अगदी कंबर कसून हे शिवधनुष्य पेलायला तयार होतात आणि खूप समर्थपणे आपली जबाबदारी निभाऊन नेतात पण या सगळ्याला पुरे पडताना शरीराची मनाची खूप दमछाक होते.

मुलासाठी अगदी सर्व काही करायला तयार असणारे हे पालक स्वतःकडे मात्र या काळात पूर्ण दुर्लक्ष करतात. त्यांनाही गरज असते एका विसाव्याची, एका आधाराची. आयुष्यभराची हि लढाई लढण्यासाठी लागणारे  मानसिक - भावनिक बळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन करू शकेल अशा व्यक्तीची. पण सर्व काही फक्त मुलासाठीच करणाऱ्या पालकांना याची जाणीवच नसते आणि झालीच तरी अशी व्यक्ती आजूबाजूला उपलब्ध असतेच असं नाही . मग डॉक्टर्स, थेरपिस्टस, यांचाशी बोलूनच हि गरज अंशतः भागवली जाते.

जर थोडसं लक्ष स्वतःच्याही मानसिक - भावनिक स्वास्थ्याकडे दिल तर पर्यायाने त्याचा फायदा मुलांनाच होणार असतो. विमानात जस सूचना देतात कि प्रथम तुमचा ऑक्सिजन मास्क लावा आणि मगच मुलाला मास्क लावा, अगदी त्याच धर्तीवर थोडसं लक्ष स्वतःच्या गरजांकडे दिल तर अधिक सक्षमपणे आपण हे पालकत्व निभाऊन नेऊ शकतो याची कल्पनादेखील नसते.

मग काय करायचं? कोणाकडे जायचं? उत्तर आहे समुपदेशन.

समुपदेशन म्हणजे काय? मला त्याची गरज आहे का? असल्यास ती कशी ओळखावी? त्याचा मला काय फायदा होईल?

या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी संपर्क करा :


वसुधा गोखले, पेडीएट्रीक फ़िजिओथेरपीस्ट कौन्सेलर (९६५७७०९८७६

1 comment:

  1. मॅम आपण लिहिलेला लेख अतिशय सुंदर आहे. मला या लेखाचा माझी समुपदेशनाची असाईनमेंट फक्त लिहीण्यासाठीच नाही तर समजून घेण्यासाठी खूप मदत झाली.

    ReplyDelete